परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
येथील युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान दत्तात्रय गुट्टे यांचा वृक्षभेट देऊन व शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त सत्कार केला. तसेच प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. वृक्षारोपणना बरोबर वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहन दत्तात्रय गुट्टे यांनी केले आहे.
शहरातील भगवान बाबा मंदिर जवळील शिवाजीनगर येथे गुट्टे यांच्या संपर्क कार्यालय येथे छोट्या खानी युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान श्री संत भगवान बाबा मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुर्यंकात मुंडे, परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे, पत्रकार मोहनराव व्हावळे, प्रा.रविंद्र जोशी, धिरज जंगले, महादेव गित्ते, विनायक कराड, वसंत फड, बळीराम गित्ते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्या सर्वांचे दत्तात्रय गुट्टे यांनी आभार मानले. दत्तात्रय गुट्टे वृक्षारोपण करतांना म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी वृक्षलागवडीसाठी आपण राहतो त्या ठिकाणी किमान एक किंवा दोन वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे असे आवाहन करण्यात आले.