बीड:आठवडा विशेष टीम― गेल्या अनेक वर्षा पासुन अंगणवाडी ताई बालकांचे व त्यांच्या मातांचे संगोपन व काळजी पुर्वक देखभाल करूण त्यांना औषधोपचार, पोषण आहार, शैक्षणीक व इतर बार्बी ची देखभाल करतात.गरोदर माता,स्तनदा माता तसेच लहाण बालकांना पोषण आहार देवुन त्यांची काळजी घेतात तसेच शासनाच्या इतर राष्ट्रीय कार्यक्रमा मध्ये सुद्धा सहकार्य करतात.तसेच वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातुन त्या नेहमी कार्यरत असतांना.सुद्धा त्यांना आज पर्यंत मानधनावरच त्यांची बोळवण या आधीच्या सरकारने के ली आहे.अंगणवाडी कर्मचारी सेविका व मदतनिस यांनी कोरोना च्या काळात हि आपल्या जिवाची पर्वा न करता सामान्य नागरीकांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जनजागृती करूण लोकांना स्वतःची काळजी घेण्या बरोबरच त्यांना शासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन त्यांच्या पर्यंत लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला.परंतु याच अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळणे अपेक्षीत असतांना हि त्यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा आजतागायत मिळालेला नाही.अंगणवाडी ताईंना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा ठाकरे सरकार तरी मिळवून देणार का असा प्रश्न उपस्थित करूण अंगणवाडी ताईंना मानधन नको वेतन द्या अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद निरीक्षक अँड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.