अंबाजोगाई तालुका

अंबाजोगाईत २४ फेब्रुवारी रोजी रमाई महोत्सवाचे आयोजन - आनंदराजजी आंबेडकर यांची विशेष उपस्थिती ; प्रबोधनपर व्याख्यान व भिमगीतांचा कार्यक्रम

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणेच यावर्षी मातोश्री रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित रमाई महोत्सव-2019 मध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.जयंती महोत्सवाचे हे 10 वे वर्ष आहे.यावर्षी महोत्सवाने वेगळेपण म्हणजे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.सोबतच व्याख्यान व भिमगीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची सुरेल मेजवानी ही अंबाजोगाईकरांना ऐकावयास मिळणार आहे.तरी शहर व परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन निमंञक मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.राहूल धाकडे यांनी केले आहे.

मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की,मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.जयंती महोत्सवाचे हे 10 वे वर्ष आहे.यावर्षी यावर्षी महोत्सवाचे वेगळेपण असे की,आंबेडकरी जनतेशी,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा संवाद व्हावा या विधायक भूमिकेतुन आनंदराजजी आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे आहेत.यावेळी पत्रकार प्रशांत लिला रामदास (ब्युरोचिफ नेटवर्क 18 लोकमत दिल्ली), प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे, आधार मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सुनिल सौंदरमल हे प्रमुख अतिथी तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूरचे डॉ.अजय ओव्हाळ, सुप्रिम कोर्ट दिल्ली येथे कार्यरत असलेले अ‍ॅड.विशाल जोगदंड, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र पोटभरे या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.अंबाजोगाईतील आंबेडकरी चळवळीतील सर्व सन्माननिय कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत.सोबतच भीमशाहीर बळीराम उपाडे व संच यांचा भिमगीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची सुरेल मेजवानी अंबाजोगाईकरांना ऐकावयास मिळणार आहे.रविवार,दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या महोत्सवाचे उदघाटन होईल.वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय,बस स्थानकासमोर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समितीचे निमंञक डॉ.राहूल धाकडे (अध्यक्ष) तसेच संयोजन समितीचे प्रा.अनंत कांबळे, मुजीब काझी,विश्वास चोबे,रविंद्र केंद्रे, डॉ.विनायक गडेकर, भिमाशंकर शिंदे, डॉ.विकास जाधव, प्रियदर्शी मस्के,संतोष बोबडे,डॉ.प्रशांत दहिरे, आरती लिंबगावकर आदींसहीत सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.