बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

बीड: ४ जुलैला पाच कोरोना रुग्ण आढळल्याने परळी शहरात १२ जुलैपर्यंत संपूर्ण संचारबंदी

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम― परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/ कर्मचारी दि.०४ जुलैच्या अहवालात कोवीड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर बैंकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांची मोठया प्रमाणात ये-जा झाली असून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक असल्याने परळी शहरातून इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार परळी शहरात ०८ दिवसांसाठी (१२ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे व खालील प्रमाणे निर्देश जिल्हाधिकारी बीड (राहुल रेखावर) यांच्याकडून देण्यात आले आहेत.

१.वद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.

२.परळी शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. तसेच शहराबाहेर जाणेसाठी व बाहेरुन शहरात येण्यासाठी काढण्यात आलेले सर्व पास रद्य करण्यात येत आहेत.

३. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, पोलीस, ग्रामविकास, नगरविकास, कृषी व आरोग्य, उपकोषागार,न्यायालयतील कर्मचारी) परळी वै. शहरातील सर्व आस्थापना (शासकीय व खाजगी आस्थापना इ.) बंद राहतील. वरील ०८ विभागाचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्र द्वारे शहरांतर्गत प्रवास करु शकतील.

५. परळी वै, शहरातील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही. परतु मेडीकल Emergencey मधील पाससाठी परळी शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज www.covid१९.mhpolice.in या वेबसाईटवर भरुन ई-पास प्राप्त करुन घ्यावा.

६. परळी शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक राहील, कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास सदरील अॅप मध्ये Self Assessment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.

७. परळी शहरात फक्त फिरते दूध विक्रते यांना परवानगी राहील. कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दूधांची पाकीटांची होम डिलेव्हरी करावी व ती करत असताना कोवीड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.

८. जार वाटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोवीड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी. तसेच सर्व वाटर सप्लार्यस कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.

०९. परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वी प्रमाणे परवानगी राहील, पंरतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी.

१०.घरगुती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.

११. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचान्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.

१२. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पास द्वारे परळी शहरांतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे.

१३. जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेबाबतचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील,

१४. पोस्ट ऑफिस व बैंका केवळ अंतर्गत महत्वाच्या कामकाजासाठी चालू राहतील. कोणत्याही ग्राहकाला प्रत्यक्ष सेवा देता येणार नाही. पोस्ट ऑफिस व बैंकचे कर्मचारी यांनी स्वत:चे ओळखपत्र वापरुन प्रवास करावा. तसेच टॉवर जवळील स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा परळी ग्रामीण (कोड ३४०६) बैंक संपूर्णपणे बंद राहील.

१५.अंत्यविधीसाठी शासनाचे पत्रकात नमूद केलेनुसार नियमानुसार परवानगी असेल.

१६. परळी औष्णिक विद्युत केंद्र चालू राहील येथील कर्मचारी यांनी त्यांचे ओळखपत्र वापरुन कामकाज करतील,

१७. धर्मापूरी रोडवरील परळी वै येथील इंडिया सिमेंट फॅक्टरी रेल्वे फाटक जवळ मधील कमीत-कमी कर्मचारी/कामगार यांना उपविभागीय अधिकारी, परळी वै यांचे शिफारशी प्रमाणे परवानगी असेल.

१७.सर्व प्रकारची मालवाहतूक, रेल्वेची मालवाहतूक अनुषंगाने परळी शहराच्या हद्यीतील गोदामे चालवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदर कामकाज करणारे कर्मचारी/हमाल त्यांचे ओळखपत्र वापरुन कामकाज करतील.

सदरचे आदेश दिनांक ०४/०७/२०२० रोजी श्री.राहुल रेखावर , जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिले आहेत.


आदेश (पिडीएफ PDF) – https://www.athawadavishesh.com/wp-content/uploads/2020/07/Document-14.pdf

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *