परळी:आठवडा विशेष टीम― पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर शनिवारी परळीत विनामास्क फिरणाऱ्या विरोधात परळी शहर ठाणे व संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली.तब्बल ५९ जणांविरोधात गुन्हे नोंद केले.नेहरू चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, मोंढा, शिवाजी चौक आदी ठिकाणी ही कारवाई केली. दुचाकीवर एकापेक्षा अधिक जण प्रवास करणाऱ्या, अॅटो, कारमधून ३ पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. यापुढेही अशी कारवाई सुरुच राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.