पाटोदा दि.०५:नानासाहेब डिडुळ―
२ जुलै रोजी पाटोदा येथील बामदळे वस्तीवरील अपघातामध्ये वेरना गाडी क्रमांक एम एच १२ के जे १३१४ व टू व्हीलर यांच्या अपघातामध्ये तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. २ जखमी बीड येथे खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत .व एक गंभीर जखमी ज्ञानेश्वर साहेबराव शिनूरे अहमदनगर येथील सिटी केअर दवाखान्यामध्ये ऍडमिट केले असून त्यांचे पायाचे हाड मोडले असल्यामुळे मोठे ओपरेशन करण्यासाठी मसनजोगी वस्तीवरील समाज बांधवांनी प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे मदत केली आहे .यामध्ये युवराज जाधव यांनी ५ हजार रुपयांची मदत दिली आहे .एकूण २५ हजार रुपये गोळा केले असून हॉस्पिटल ला पाठवण्यात आले आहे .दवाखाने त्यांना ५० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले असून नंतरच ऑपरेशन केले जाईल असे सांगण्यात येत आहे .हातावर पोट असल्याने व एवढे मोठे ऑपरेशन साठी पैसे नसल्याने आर्थिक अडचणीत असून त्यांना मदतीची आवाहन करण्यात येत आहे .जखमीचे नाव ज्ञानेश्वर साहेबराव शिनूरे खाते क्रमांक ३६२८९६८३१०५ ,आयएफएससी कोड: SBIN0011509 समाजातील दानशूरांनी या जखमींना मदत करावी असे आवाहन युवराज जाधव यांनी केले आहे.