औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याविना, शासकीय कामे रखडली

सोयगाव,दि.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे हे आठवड्याच्या रजेवर आहे.सोयगावला सिल्लोडच्या गटविकास अधिकाऱ्यांना पदभार दिला आहे.परंतु सिल्लोडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पदभार घेण्यासाठी नकार दिल्याने सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याविना आहे.त्यामुळे नागरिकांची मात्र लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या कामांना गती येत नाही.त्यामुळे लॉकडाऊन नंतरही गटविकास अधिकाऱ्याविना सोयगाव पंचायत समितीला लॉकडाऊन झाले आहे.
पंचायत समितीच्या विविध योजनांच्या प्रलंबित संचिका लॉकडाऊन नंतर दाखल करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी एकच धावपळ केली आहे.परंतु पंचायत समितीला गटविकास अधिकारीच नसून प्रभारी आदेश दिलेल्या सिल्लोडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सोयगावला पदभार घेण्यास असमर्थता दर्शविली असल्याने सोयगाव पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकाऱ्याविना ठप्प झाला आहे.

ऐन कोरोना संसार्गात गटविकास अधिकारी नाही-

सोयगाव तालुक्यात कोरोना संक्रमणाची संख्या नियंत्रित असतांना अचानक नवीन रुग्ण आढळत आहे.मात्र उपाय योजनांची शासनाची दुसरीबाजू असलेल्या पंचायत समिती यंत्रणेचा अधिकारीच नसल्याने उपाय योजनांमध्ये अडथळे निर्माण झाली आहे.पळसखेडा ता.सोयगाव येथे नुकताच नवीन संक्रमित रुग्ण आढळला असतांना मात्र या ठिकाणी पंचायत समितीचा एकही कर्मचारी हजर नव्हता,त्यामुळे आरोग्य आणि महसूलच्या यंत्रणांनी पळसखेडा येथील परिस्थिती हाताळली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.