अंबाजोगाई तालुकाराष्ट्रीयसामाजिक

पुलवामात शहिद झालेल्या भारतीय जवानांना मुस्लिम युथचे अभिवादन

अंबजोगाई मुस्लीम युथने काढला कँन्डल मार्च

अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरातील मुस्लिम युथच्या वतीने पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कँन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले.या कँन्डल मार्चमध्ये सहभागी होवून अंबाजोगाई शहरातील सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामधील सर्वपक्ष व संघटना यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

अंबाजोगाईतील अलफलाह ग्रुप, एस.के.ग्रुप,किरमाणी ग्रुप,अशियाना ग्रुप, मुस्लिम महासंघ,ह्युमन राईट्स संघटना,असरा सेवाभावी संस्था,रेस अ‍ॅकॅडमी,एसआयओ.
ग्रुप व कॉमनवील मल्टीपर्पज चॅरीटेबल ट्रस्ट यांनी रविवार,दि.17 फेब्रुवारी काढलेल्या या कँन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला.हा कँन्डल मार्च अंबाजोगाई शहरातील नुरानी मस्जीद ते शिवाजी चौक या मार्गे निघाला.मुस्लिम युथ अंबाजोगाईच्या वतीने यावेळी शहीद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कँन्डल मार्चमध्ये आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या सहीत सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते सहभागी झाले.कँन्डल मार्चच्या यशस्वितेसाठी पाच जणांची एक समिती गठीत करण्यात आली होती.त्यात शेख मुकरम,जहागीर पठाण, अकबर पठाण,शेख तारेख व हकीम लाला यांचा समावेश होता.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.