क्राईमपरळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: परळी शहरात बरकतनगर रोडला अंदाजे ३ लाखाचा गुटखा पकडला ; संभाजी नगर पोलिसांची कार्यवाही

परळी/बीड दि.०६:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील बरकत नगर रोड ला बोलोरो पिकअप वाहनांमध्ये गुटखा असल्याच्या गुप्त माहितीवरून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी शहानिशा केली असताना पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप मध्ये राजनिवास गुटखा असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून वाहन चालक सह एक जण पलिसांच्या ताब्यात आले आहेत.सदरील कामगीरी पोलीस निरीक्षण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह .व्यंकट भताने पो.ना. दत्ता गित्ते, पो.ना. बाबासाहेब आचार्य यांनी या वाहन , ड्राइव्हर सह एक जणास पोलीस ठाण्यात हजार केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान परळी शहरात दि.४ रोजी कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण भेटताच मा.जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परळी शहर संचारबंदी करण्यात आली असता आज अचानक शहरातील बरकतनगर येथे हा माल आला कसा ? जिल्हा बंदी असूनही चेकपोस्ट वरून वाहन गुटखा माल घेऊन शहरात प्रवेश कसे करतात ? या बाबत शहरात चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.