अंबाजोगाई तालुकाकार्यक्रमसामाजिक

कै.व्यंकटराव डावळे विद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा

शिवचरित्र वाचल्याने जीवनाचे ध्येय गाठता येते-शिवव्याख्याते चंद्रकांत हजारे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून प्रेरक इतिहास माहिती होतो. जीवनातील उच्च ध्येय गाठण्यासाठी व यश संपादन करण्यासाठी शिवचरित्र उपयोगाचे ठरते नव्या पिढीने शिवचरीत्राचे वाचन करावे असे आवाहन शिवव्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी केले.

अंबाजोगाई येथील मेडीकल परिसरात असणार्‍या कै.व्यंकटराव डावळे विद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. आदमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते चंद्रकांत हजारे हे होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक जे.एस. आदमाने यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार एन.एस.गोचडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.एस. देशमुख,एस.डी. देशमुख,एस.ए.लंगे, एस.व्ही.गिरगिरवार,एस.बी.जाधव,एम.एस.
गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.