सोयगाव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
एकीकडे पावसाचा खंड आणि दुसरीकडे अचानक कपाशी पिकांवर हिरव्या(पाने कुरतडनाऱ्या)अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे याप्रकारामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोयगावसह तालुक्यात पावसाने मोठा खंड केलेला असतांना अचानक हिरवट रंगाच्या अळींचा कपाशी पिकांना घेराव घालून कपाशीचे पाने कुरतडत आहे.यामुळे कपाशी पिके संकटात सापडली आहे.मात्र यावर उपाय योजनांसाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फवारणीचा प्रयोग हाती घेतला आहे.सोयगाव तालुक्यात यंदाच्या हंगामात २८ हजार ५४८ हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे.परंतु पावसाची दडी आणि आंतर मशागतीसाठी मजुरांची टंचाई या समस्येत शेतकरी असतांना अचानक या हिरव्या रंगाच्या अळींचा वाढता प्रादुर्भाव झालेला असून या अळीकडून मात्र कपाशी पिकांची पाने फस्त केली जात आहे.आधीच पावसाची अडचण आणि त्यात अळींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी चिंतेत अडकला आहे.
ढग येतात….परंतु पाऊस होत नाही
सोयगावसह तालुक्यात आठवडाभरापासून ढगांचा मोठा खेळ सुरु झालेला आहे.दुपारनंतर ढग दाटून येतात,परंतू पावूस झाल्याची तालुक्यात कुठेही नोंद होत नाही त्यामुळे सोयगाव तालुक्यात पुन्हा ढगांनी उन सावल्यांचा खेळ सुरु केलेला आहे.