सोयगाव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पळसखेडा ता.सोयगाव येथे जळगाव जिल्ह्यात खासगी उपचारासाठी जाणाऱ्या एकाचा अहवाल कोरोना सकारात्मक आढळल्याने सोमवारी तालुका आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावभर सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याने गावात एकालाही कोविड-१९ ची लक्षणे आढळली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.त्यामुळे पळसखेडला आलेला कोरोना जळगाव जिल्ह्यातूनच शिरकाव झाल्याचा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पळसखेडा(ता.सोयगाव)गावात रुग्ण सकारात्मक आढळताच सोमवारी आरोग्य विभागाच्या १० कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून कोविड -१९ सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती यामध्ये एकाच दिवसात २५०० ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.या तपासणीत एकालाही ताप,सर्दी,खोकला असे लक्षणे आढळून आलेले नसल्याची तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली,परंतु तरीही काळजी म्हणून रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येवून १२ जणांना कोरोटाइन करण्यात आले आहे.गावातील एका प्रभागातील १० घरांचा भाग सील करण्यात येवून त्या कंटेनमेंट झोनमध्ये नियमित कोविड-१९ तपासणी करण्यात येणार आहे.सोमवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पळसखेडा ता.सोयगाव येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना उपाय योजनांच्या सूचना दिल्या आहे.उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,आदींचे पथक गावात तळ ठोकून होते.