अंबाजोगाई तालुकासामाजिक

अंबाजोगाईत राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग यांच्या वतीने कार्यशाळा

राजयोग ही सुदृढ मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली-ब्रह्मकुमारी सुनिता बहेनजी

अंबाजोगाई (प्रतिनिधी): जगात विविध क्षेत्रात चाललेली गळेकापू स्पर्धा,एकमेकांशी अनावश्यक होणारी तुलना,कुरघोडी, चढाओढ यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ही मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक असुन सुदृढ मानसिक स्वास्थ्याची गुरूकिल्ली राजयोग ध्यानाभ्यास होय.आजच्या गतीमान आणि धावपळीच्या, स्पर्धेच्या जीवनात ताण-तणाव व मानसिक समस्या भेडसावित असताना प्रत्येकास मानसिक स्वास्थ्य असणे अत्यंत गरजेचे आहे.अशा परिस्थितीत मेडिटेशन,धानाभ्यास हे मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वाचे ठरणारे आहेत असे मौलिक विचार
ब्रह्मकुमारी सुनिता बहेनजी यांनी राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत आयोजित मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.

अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील एम.आर.एस.हॉल येथे बुधवार,दि.20 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्रमांतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे मानसिक बळ वाढविणे हे प्रमुख उद्देश होता. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग,महाराष्ट्र यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंटआबु शाखा अंबाजोगाई आणि शासनाच्या वैद्यकिय विभागामार्फत सदरहू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून ब्रह्माकुमारी सुनिता बहेनजी व राजयोग ध्यानअभ्यास शिकविणार्‍या ब्रह्माकुमारी मंजु बहेनजी यांनी उपस्थितांना मुख्य वक्ता म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने मेडिटेशनद्वारे गहनशांतीचा अनुभव करुन दिला.ज्यायोगे दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही क्षण का असेना तणावमुक्तिचा अनुभव घेतला.
प्रशिक्षणामुळे आपण देत असलेल्या सेवेत अधिक निपुणता येते आणि अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा जनतेस दिली जाऊ शकते या उद्देशाने आरोग्य सेवेत असणार्‍या आपल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण मिळावे आणि मानसिक स्वास्थ्याचे त्यांनी प्रबोधन करावे या उद्देशाने कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेसाठी अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी,नर्सेस आदी उपस्थित होते. 55 ते 60 जण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी मुंडे(औषधनिर्माता वर्ग-2) यांनी करून उपस्थितांचे आभार श्रीमती किशोरी मुंढे (प्रशासकीय अधिकारी,वैद्यकीय महाविद्यालय) यांनी मानले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.