जय भगवान महासंघाचे संस्थापक बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल !
बीड:आठवडा विशेष टीम―
‘लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी रात्रंदिवस पक्षासाठी जीव ओतून शहरापुरता मर्यादित असणाऱ्या पक्षाला खेड्यापाड्यात आणि बहुजनांच्या दारात पोहोचून विस्तारित केले; परंतु याच पक्षाला आज मात्र विविध ठिकाणी ‘मुंडे’ नावाबद्दल तिरस्कार होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे, अशी उद्विग्नता करून भाजपला साहेबांनंतर ‘मुंडे’ नावाची ‘ॲलर्जी’ झाली का..? असा संतप्त सवाल जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर येथील मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे या कर्तव्यतत्पर आणि राष्ट्रहित दक्ष अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्याविषयी निष्फळ गरळ ओकून आडवे येण्याचे पाप ही मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून करत असल्याचे समाजधूरिनांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिसत आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे दोषी नसतानाही आणि आज पर्यंत त्यांचा भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी, राजकारण्यांना न जुमानता स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रकार्य करण्याची त्यांची निडर वृत्ती साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे.
असे असताना, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक करून शाबासकी देण्याऐवजी त्यांच्यावर नको ते आरोप करून कोणालातरी पुढे करून अडचणीत आणण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही, हे ध्यानात राहू द्या… असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
‘सर्वसामान्य, गोरगरीब, कर्मचारी-अधिकारी,विद्यार्थी, कार्यकर्ता, नेता, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही; यासाठी जय भगवान महासंघ सदैव रस्त्यावर असेल; महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली जेंव्हा आदेश येईल, तेंव्हा राज्यभरासह बीड जिल्ह्यातील सैनिक उग्र आंदोलनात रस्त्यावर उतरतील; याची सुरुवात पाटोद्या पासून करू…!’
…तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू !’
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर मुंडे नावाची अडचण करण्यात पक्षाने धन्यता मानली आहे का ? कुठला आणि कसला बदलला आहे? असे सवाल उपस्थित करून बाळासाहेब सानप पुढे म्हणाले, येथून पुढे सर्वसामान्य, बहुजन, समाजातील कार्यकर्ता, नेता, कर्मचारी-अधिकारी यांच्याबाबत असे अडवणुकीचे आणि दाबण्याचे प्रयत्न झाल्यास, जय भगवान महासंघाच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करून जाब विचारला जाईल !’ असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.
―रामभाऊ सानप,
तालुकाध्यक्ष
जय भगवान महासंघ पाटोदा
‘केवळ मतदानासाठीच समाजाचा वापर ?’
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समाज एकसंघ पणे पक्षा च्या पाठीमागे राहिला; परंतु दुर्दैवाने त्यांच्यानंतर समाजाचा केवळ मतदानासाठी वापर करून कार्यकर्ते, नेत्यांना,व अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे महापाप होत असल्याचे समाजधुरीण यांच्या लक्षात येत आहे. या बाबीची वेळीच दखल घेऊन भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, असा गंभीर इशाराच अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.