पाटोदा तालुकामहाराष्ट्र राज्यशेतीविषयक

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी,स्वामीनाथ आयोगाच्या शिफारस लागू करून,शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफ करावे -पाटोदा येथील शेतकऱ्यांची मागणी

पाटोदा (शेख महेशर) दि.२२: शेतकऱ्यांना सर्व कर्ज माफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करुन शेतकऱ्यांना पुर्ण वीज बिल माफ करावे. हेक्‍टरी ५०,००० हजार रुपये अनुदान द्यावे, वृद्ध शेतकऱ्यांना ५००० हजार रुपये पेन्शन लागू करावी, अशा विविध मागण्यासाठी विधान भवनावर नाशिक ते मुंबई पायी मोर्चा भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आलेला आहे. काल चार वाजता नाशिक वरून हा मोर्चा मुंबईकडे कूच करणार होता परंतु पोलीसांनी अचानक परवानगी नाकारून नाशिक जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून शेतकरी नेत्यांची धरपकड चालू केली. त्या मुळे मोर्चाला विस्कळीतपणा आणण्याचे काम प्रशासनाने केले ३० ते ४० हजार शेतकरी काल रात्री रात्रभर रोडवरती बिगर अन्नपाण्याचे उपाशी झोपावे. शेवटी सकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांना जाण्यास परवानगी दिली जाणून बुजून शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम प्रशासन करत आहे. त्या मुळे आज- पाटोदा येथील शेतकऱ्यांच्या वतीने पाटोदा तहसिलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला, व जर मोर्चास अडचणी आणण्याचा प्रयत्न केल्यास पाटोदा तालुक्यामध्ये गावोगावी आंदोलन उभा केले जाईल. व आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जवाबदार राहील असे कळविण्यात आले आहे. या निवेदनावर शेतकरी नेते गणेश कवडे, भाई विष्णुपंत घोलप, चक्रपाणी जाधव, दादा जावळे, बापुराव भवर, भाऊसाहेब सानप, रमेश तनपुरे, रघुनाथ संकुडे, शरद कदम, मधुकर जगदाळे, नवनाथ जगदाळे यांच्या सह इत्यादी च्या सह्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.