औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगावला काँग्रेस पक्षाचा मोर्चा

सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
एकेकाळी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यावर नेतृत्व करणाऱ्या सोयगाववर आता दिल्ली नेतृत्वाची नजर असून त्यामुळे सोयगावात कॉंग्रेस पक्षाचे नव्याने रोपटे लावण्याचे काम करण्यासाठी मी सोयगावात आलो आहे.सोयगावातील मजूर,शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी कॉंग्रेस पक्ष मजबुतीने उभा आहे.असे प्रतिपादन कॉंग्रेसचे जिल्ह्ध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्यान काळे यांनी मंगळवारी इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी निषेधार्थ ते बोलत होते.
तालुका कॉंग्रेस कमेटी आणि जिल्हा शहर कमेटीच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ सोयगावला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येवून जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्यान काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रवीण पांडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार कल्यान काळे यांनी सांगितले कि,सोयगावात जावून कष्टकरी,शेतमजूर,आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या असे स्पष्ट आदेश पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी दिल्याने मी सोयगावात आलो आहे त्यामुळे आता सोयगावकरांनो तुमच्यावर आता दिल्लीच्या नेतृत्वाची नजर आहे.त्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कम उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे कि,देशभर इंधन दरवाढ करण्यात आलेली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळे बंदीमुळे जनता एकीकडे त्रस्त असतांना इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीमुळे मोठी चिंता वाढली आहे.त्यामुळे या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात सोयगाव तहसील कार्यालयावर तासभर निदर्शने करून मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव,किरण पाटील डोणगावकर,रामू काका शेळके,आनंदा पाटील,लाखुसिंग नाईक,उस्मान पठान,शेख रवूफ,विश्वास नाईक,बाळू खंडाळे,हरीश राठोड,हेमराज राठोड,सुनील शिंदे,राजू लव्हाळे,महिला कॉंग्रेस कमेटीच्या सीमा लव्हाळे,आशा लोखंडे,दुर्गा तांगडे,सुनिता महाकाळ,रईसा पठाण,विमल सूरवाले,जाकीया शेख,रिजवाना शेख आदींची उपस्थिती होती.
छायाचित्रओळ-सोयगाव-सोयगाव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनानंतर निवेदन देतांना माजी आमदार डॉ.कल्यान काळे,तालुका कॉंग्रेस कमेटीचे प्रकाश जाधव व इतर.दुसर्या छायाचित्रात धरणे आंदोलन व निदर्शने करतांना कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button