बीड:आठवडा विशेष टीम― १५ जुन २०२० रोजी बीड तालुक्यातील मांजरसुंबा-पाटोदा रोड पासून जवळच असलेल्या मसेवाडी येथिल शेतकरी संजय बाळु सोनावणे वय ३३ वर्षे पेरणीसाठी बि-बियाणे घेऊन गावी परतत असताना मुळुक पुलाजवळील मद्यधुंद अवस्थेतील चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली,एक मुलगा आणि आई वडील .कमावणारे संजय एकमेव होते. त्यानंतर सांत्वन करण्यासाठी सर्व पक्षांचे प्रमुख लोकप्रतिनिधी आले त्यांनी आश्वासनं दिली.त्यांची वृत्तपत्रांमध्ये फोटो छापुन आले. आज ३ आठवडे झाले, नंतर कोणीही विचारपूस केली नाही कि मदत केली नाही.त्यामुळे लोकप्रतिनिधींचे सांत्वन पिडीतेच्या दु:खावर मिठ चोळण्यासाठी होते कि फोटोसेशन साठी ? त्याचबरोबर अपघातानंतर मिळणारे २० हजार रूपये तहसिल प्रशासनाने सुद्धा दिले नाहीत त्यामुळे उदासिन प्रशासन आणि संवेदनाहीन लोकप्रतिनिधी पाहून असा प्रश्न पडला आहे,त्याचवेळी निदान मुलांकडे पाहून सामान्य माणसाने मदत करावी अशी विनंती केली आहे.
निशा संजय सोनवणे , पत्नी―
संपूर्ण कुटुंबांमध्ये संजय एकटेच कमावते होते , दोन मुली मोठी प्रिती वय ११ वर्षे ५ वी शिकत आहे, दुसरी मुलगी आकांक्षा वय ८ वर्षे २ री तर मुलगा सार्थक वय ६ वर्षे पहिलीत शिकत आहे, एकुण १० गुंठे कोरडवाहू जमिन, आता या मुलांच पुढं कसं व्हायचं, पुढाऱ्यांनी आश्वासन दिले,पण उपयोग झाला नाही, सामान्य माणसाने पुढं येऊन मदत करावी.
बाळु सोनावणे ,मुलाचे वडील मो.नं.८८०६५०८६२७–
मुलाच्या मृत्यूनंतर अग्निडाग देताना आणि ईतरवेळी शिवसेनेचेच जयदत आण्णा क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संदिप भैय्या क्षीरसागर, भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे संस्थापक, अध्यक्ष विनायक मेटे यांनी सर्वांनी भेट देऊन सांत्वन केले,मदतीचे आश्वासन दिले, परंतु नेहमीप्रमाणेच ते हवेतच विरले.
सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी यथाशक्ती मदत करावी – डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे दिग्गज नेते यांनी सांत्वन केले खरे, पेपरमध्ये फोटो छापुन आले,मात्र खरी मदत मिळालीच नाही,तर ऊदासिन तहसिल प्रशासनाने तात्काळ २० हजार रुपये मदत अजुन मिळालीच नाही म्हणुन पिडीतेच्या म्हणण्यानुसार सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था अथवा सामान्य माणसाने मदत करावी असे आवाहन एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करत आहे, निशा संजय सोनवणे यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँक लिंबागणेश येथिल खाते क्रमांक व आयएफएससी कोड पुढीलप्रमाणे आहे ज्यांना जमेल त्यांनी यथाशक्ती मदत करावी महाराष्ट्र ग्रामीण बँक खाते क्रमांक ८००२५५९७९२१ ,आयएफएससी कोड – MAHG0004525 असून माणुसकीच्या भावनेतून एक मदतीचा हात म्हणुन पुढे यावं एवढीच नम्र विनंती आहे