सोयगाव:शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य ,कॉंग्रेसचा संकल्प

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा पातळीवरून राज्यपातळीपर्यंत पोहचवणार असल्याने राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नयन देण्याचे काम करणार असल्याचे सुतोवाच पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार कल्यान काळे यांनी सोयगावला कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत केले आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्यान काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोयगावला तालुका कॉंग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीचे प्रास्ताविक तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.यावेळी कार्यकर्त्यांनी गावातील विविध समस्या उपस्थित केल्या होत्या या समस्य सोडविण्यासाठी निश्चित जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर मार्ग काढण्याचे आश्वासन डॉ.कल्यान काळे यांनी दिले,यावेळी तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल निकम,जिल्हा बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर,रामू काका शेळके,जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीराम महाजन,सिल्लोड चे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट,आनंदा पाटील,लखुसिंग नाईक,उस्मान पठान,शेख रवूफ,विश्वास नाईक,बाळू खंडाळे,हरीश राठोड,हेमराज राठोड,सुनील शिंदे,राजू लव्हाळे,महिला कॉंग्रेस कमेटीच्या सीमा लव्हाळे,आशा लोखंडे,दुर्गा तांगडे,सुनिता महाकाळ,रईसा पठाण,विमल सूरवाले,जाकीया शेख,रिजवाना शेख आदींची उपस्थिती होती.युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी आभार मानले.