रेल्वे बोर्ड सदस्य धनराज गुट्टे यांच्या पाठपुराव्याला यश ; सचखंड एक्सप्रेस रेल्वे सेलू स्थानकावर थांबा घेणार

सेलू प्रतिनिधी दि.०७ : सेलूच्या जनतेसाठी एक चांगली बातमी हाती लागली आहे.सेलू रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेस आता स्टॉप घेणार आहे.राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर साहेब व रेल्वे बोर्ड सदस्य धनराज गुट्टे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर आज पासून सचखंड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सेलू स्थानकावर थांबा घेणार आहे.

या मागणीसाठी भाजप नेते शिवप्रसाद राठी यांच्यासह अनेकांनी धनराज गुट्टे यांच्याकडे कायम पाठपुरावा केलेला होता त्यामुळे हे यश आज मिळाले आहे.आज पर्यंत कधीच न थांबणारी सचखंड रेल्वे आज पासून सेलूला थांबा घेत आहे.

रेल्वे क्र.१२७१५/१२७१६ एच.एस.नांदेड-अमृतसर-एच.एस.नांदेड सचखंड एक्सप्रेस ह्या गाडीसाठी परभणी नांदेड सेक्शन मधील सेलू रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *