बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

धरण उशाला अन कोरड घशाला …. सोयगावकर कृत्रिम पाणी टंचाईमुळे हैराण

सोयगांव दि.०४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शहरात नगर पंचायत च्या ढिसाळ व अनियंत्रित कारभारामुळे सोयगावकरांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेताळवाडी धरण दोन महिन्यांपासून ओव्हरफ्लो होऊन सोना नदी दुथडी वाहत आहे त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत झाली आहे .कुठे सहा तर कुठे आठ दिवसापासून पाणी येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज मुख्याधिकारी मकसूद शेख यांची भेट घेत संताप व्यक्त केला.
सोयगाव शहरात नगर पंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे.पुरेशी वीज मिळत नसल्याचे कारण पुढे करत नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. वेताळवाडी धरण दोन मिहिन्यांपासून ओव्हरफ्लो झाले असून सोना नदी दुथडी भरून वाहत . डोळ्यासमोरून पाणी वाहून जात असताना नळाला पाणी येत नाही. त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत सोयगावकरांची झाली आहे. दररोज शेतात कामाला जायचे थकून भागून आल्यावर हातपंपावर पाणी भरायला जायचे हे नित्याचेच झाल्यामुळे नागरिक विशेषतः महिला प्रचंड संतापल्या आहे. त्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी मुख्याधकारी मकसूद शेख यांची भेट घेतली. पाणी का मिळत नाही या प्रश्नावर आक्रमक झलेल्या नागरिकांसमोर शेख यांनी पाणी पुरवठा कर्मचार्यांना बोलावून घेत जाब विचारला असता वीज मिळत नसल्याचे कारण कर्मचार्यानी पुढे केले. त्यावर लगेच उपअभियंता गौर यांना बोलावण्यात आले. आठ तास सुरळीत लाईट दिली जाते एखादयवेळेस तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो असे गौर यांनी सांगितले. माजी सरपंच वसंत बनकर, नरसेविका मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे राजेंद्र आहिरे ,रवींद्र काळे , राजेंद्र दुतोंडे, पुनामसिंग परदेशी , सुनील काळे ,विष्णू बडगुजर , रऊफ देशमुख ,अस्लम पिंजारी, संदीप चौधरी , रवींद्र काटोले, रऊफ शेख , आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.
व्हाट्सअप ग्रुपवर माहिती द्या
पाणी पुरवठा कर्मचारी यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करावा त्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार , नगरसेवक ,न मुख्याधिकारी ,महावितरण अधिकारी यांचा समावेश करीत दररोज पाणी पुरवठयाबाबत व निर्माण होणाऱ्या समस्येबाबत कळवावे अशा सूचना यावेळी मुख्याधिकारी मकसूद शेख यांनी दिल्या.

मासिक मिटींगच्या ठरावावर निर्णय होत नाही
मासिक मिटिंग मध्ये अनेकवेळा पाणी पुरवठयासाठी जनरेटर घेण्याबाबत सूचना केल्या परंतु त्यावर निर्णय होत नाही. कर्मचारी नीट सांगत नाही आणि ऐकत नसल्याचे नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती मनीषा चौधरी यांनी खंत व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *