बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

पंकजाताई मुंडे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार ;माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचे निघाले आदेश , खरीपांच्या पिकांना मिळणार जीवदान

परळी दि.०८:आठवडा विशेष टीम― ऊसासह खरिपांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीनंतर पाटबंधारे विभागाने मंगळवारी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचे आदेश काढले. या आदेशाने आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

गेल्या पंधरा-वीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे परळी तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर या खरीपाच्या पिकासह ऊसाचे पीकही संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पिकांना जीवदान देण्यासाठी माजलगाव धरणासह वाण धरणाचे पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली होती व यावर तातडीने आदेशित करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी यांनी काल मंगळवारी सायंकाळपासून पाणी सोडण्याचे आदेश काढले. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हे आदेश काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आदेशामुळे पाणी उपलब्ध झाल्याने पावसा अभावी कोमेजून जात असलेल्या खरिपाच्या पिकासह ऊसालाही जीवदान मिळाले आहे. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच पिके वाचल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *