बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

बीड जिल्हा काँग्रेसच्या शिबिरात ; 29 जणांचे रक्तदान ;आतापर्यंत 585 जणांचे रक्तदान-राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित अकराव्या टप्प्यातील शिबीरात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली रविवार,दिनांक 18 ऑक्टोबर रोजी 29 काँग्रेस कार्यकर्ते यांचेसह आजपर्यंत एकूण 585 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या राज्यासह अंबाजोगाईत राज्यात कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा अकराव्या वेळी रविवार,दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक सुनील व्यवहारे,राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,दिपक गुंजाळ,सुधाकर टेकाळे,महेश वेदपाठक आदींसह इतरांची उपस्थिती होती.या शिबीरात काँग्रेसच्या 38 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी रक्तपेढीचे प्रमुख डॉ.विनय नाळपे,डॉ.आरती बर्गे,डॉ.कृष्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे तंञज्ञ शशिकांत पारखे,शेख बाबा,जगदीश रामदासी या कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले.सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान करण्यात आले.स्वाराती रूग्णालयात दररोज 25 ते 30 रूग्णांना रक्ताची गरज असते.कोरोना काळात तर रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो.सातत्याने रक्ताची गरज ही असते.कोरोना संसर्गामुळे सामान्य लोक रक्तदान करण्यासाठी घाबरत आहे.अशा काळात
आवश्यकतेनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन काळात सातत्याने रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्त संकलनासाठी सहकार्य करीत आहेत हे विशेष होय.त्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व काँग्रेस कार्यकर्ते यांचे आभार मानून स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

585 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान-राजकिशोर मोदी

===================
आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे महसुल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात आणि आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांनी आपल्या सर्वांना आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल ते 18 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एकूण 11 वेळा आयोजित शिबीरात मिळून आज तारखेपर्यंत एकूण 585 जणांनी रक्तदान केले आहे.रविवार रोजी आयोजित रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणारे काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेसह सहभागी सर्व रक्तदात्यांचे आभार. पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार काँग्रेस कार्यकर्ते आणखी रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *