बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांचा सन्मान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ,अंबाजोगाई संचालित डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांना नुकतीच वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड ऍडव्हान्स स्टडीज (व्हिस्टास) विद्यापीठ,चेन्नई मार्फत नुकतीच फार्मसी विषयातील सर्वोच्च पी.एच.डी ही पदवी प्राप्त झाली.त्याबद्दल संस्थेचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी गुणगौरव करून श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रा.डॉ.संतोष तरके यांचा सन्मान केला.

प्राचार्य डॉ.संतोष तरके हे सध्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई इथे डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी घेतलेल्या अतिउच्च शिक्षणाचा गौरव बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव संस्थेतर्फे 40,000/- रूपयांचा धनादेश देऊन करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक,पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,भुषण मोदी,सुरेश मोदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद टाकाळकर यांनी केले.”फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस” या विषयावरील शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठा कडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्य विषय होता.

डॉ.तरके यांचे संशोधन राष्ट्र उपयोगी ठरेल

===================
प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मूलभूत संशोधन करून “फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस” या विषयावरील आपला शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठाकडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्य विषय होता.हा विषय उपयुक्त असून तो राष्ट्र उपयोगी ठरेल.प्राचार्य डॉ.तरके यांचा अंबाजोगाईकरांना सार्थ अभिमान आहे.श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळासाठी ही भूषणावह बाब आहे.

-राजकिशोर मोदी (संस्थापक सचिव,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ.)


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *