बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

बुट्टेनाथ दरी येथील कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने अंबाजोगाई शहरालगत बुट्टेनाथ दरी या ठिकाणी अवैधरित्या गावठी मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच रविवार,दि.27 डिसेंबर रोजी धाड टाकून केलेल्या कारवाईत 1 लाख 14 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण 4 गुन्हे दाखल केले असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात.प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांनी सन 2018 ते आज रोजी पर्यंत केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर,अवैध मद्यनिर्मिती,अवैध दारू वाहतुक तसेच अनेक ढाबे यावर वेळोवेळी कारवाई करीत तब्बल 37 लक्ष रूपयांहून अधिक रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हे ही दाखल केले.प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांच्या धडाकेबाज कारवाईचे जनतेतून नेहमीच स्वागत झाले आहे.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज,माजलगाव,धारूर,परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात.त्यामुळे जिल्हाधिकारी राहूलजी रेखावार यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीनजी धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणूक-2020 निमीत्ताने आदर्श आचारसंहिता सुरू आहे तसेच 31 डिसेंबर ही वर्षपूर्ती व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यात बुट्टेनाथ दरी व परिसरात गस्तीवर असताना केलेल्या कारवाईत एकूण 4 गुन्हे नोंदवले आहेत. ज्यात अज्ञात आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा- 1949 अंतर्गत बुट्टेनाथ दरी या ठिकाणी एकूण गुन्हे 4 नोंदवले त्यात 4 बेवारस गुन्ह्यांचा ही समावेश आहे.टाकलेल्या धाडीत 4600 लिटर रसायन,200 लिटरचे 23 बॅरल,2 टोपली असा एकूण 1 लाख 14000/- रूपये (अक्षरी एक लाख चौदा हजार रूपये) किंमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे.बुट्टेनाथ दरी या अतिशय दुर्गम ठिकाणी केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड,दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले,जवान बी.के.पाटील,जवान तसेच वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला होता.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *