बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

पूजा सिरसट यांची बांधिलकी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास केली मदत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास पूजा गुलाबराव सिरसट यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाफेच्या मशीन देवून मदत केली.वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक कार्य केल्याबद्दल पूजा सिरसट यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

आज काल वाढदिवस म्हटले की,केक,पार्टी,फिरायला जाणे असे आजच्या तरूणाईचे समीकरणच बनलेले असते.मात्र,या सा-या अनावश्यक गोष्टींना फाटा देत अंबाजोगाईतील पूजा गुलाबराव सिरसट यांनी गोरगरीब रूग्णांना,गरजूंना मदत करण्याचे ठरवले.त्यानुसार सोमवार,दिनांक १० मे रोजी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयातील रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणा-या वाफेच्या मशीन देवून सामाजिक बांधिलकी जोपासली.मागील वर्षीही पूजा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परीसरातील गरजू कुटूंबिय यांना अन्न-धान्य आणि महिलांना साड्या वाटप केल्या होत्या.यावर्षी पूजा गुलाबराव सिरसट यांनी वाढदिवसानिमित्त लोखंडी सावरगांव कोविड रूग्णालयास वाफेच्या मशीन भेट स्वरूपात दिल्या.यावेळी रूग्णालयाच्या अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे,मेडिकल ऑफीसर डॉ.डी.पी.गायकवाड,डॉ.केंद्रे,ज्येष्ठ पत्रकार मधुकर सिरसट,उत्तम डोंगरे,प्रा.रवि शिंदे,डॉ.बाबासाहेब शिंदे,गुलाबराव सिरसट,केशर सिरसट,प्रा.प्रशांत मस्के,शैलेश ढोबळे,अहमद सय्यद,अक्षय सिरसट,हर्षवर्धन शिंदे आदींची उपस्थिती होती.या बाबतीत बोलताना पूजा सिरसट म्हणाल्या की, जीवनात अनेक लोकांना एक वेळचा आनंद देखील मिळत नाही.राज्यात सर्वञ कोविडचा प्रादुर्भाव आहे.तर अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे.त्यामुळेच माझे तरूणाईला आवाहन आहे की,आपणच उद्याचे भविष्य आहात.सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे.आपल्या वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रम,वृद्धाश्रम,रूग्णालय, दुष्काळग्रस्त,शेतकरी, शाळा,अंध,दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा.जेणेकरून सामाजिक भान जपण्याचे कार्य आपल्या हातून घडेल असे पूजा सिरसट यांनी सांगितले.तसेच यावेळी बोलताना अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे म्हणाल्या की,सध्या सगळीकडेच तरूण मुले व मुली हे आपला तसेच आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च करतात अशा काळात पूजा सिरसट या ताईने आपल्या वाढदिवसानिमित्त परिवाराचा वारसा जोपासत वेळोवेळी गोरगरीब रूग्ण,तसेच गरजूंना मदत करण्याचे नुसते ठरवलेच नाही.तर सामाजिक भान जपण्याचे ही काम करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.यापुढे ही आपणांकडून अशीच समाजसेवा घडावी,आमच्या रूग्णालयातील वैद्यकीय सेवेवर विश्वास व्यक्त करून कोविड रूग्णालयास वाफेच्या मशीन देवून मदत केल्याबद्दल सिरसट परिवारास धन्यवाद देवून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सदरील भेटवस्तू यांचा अभिमानाने स्विकार करीत असल्याचे अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे यांनी यावेळी सांगितले.