बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

पाटोदा: शिंदेवस्तीकर (गारमाळ) 16 ऑगस्टला रामेश्वर साठवण तलावात आंदोलन करणार – डाॅ.गणेश ढवळे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील शिंदेवस्ति (गारमाळ) ग्रामस्थांनी वारंवार निवेदन प्रशासनाला देऊन फारसा फायदा न झाल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी रामेश्वर साठवण तलावात धरणात उतरून आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड ,उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार आष्टी, तहसिलदार पाटोदा, लघुपाटबंधारे विभाग आष्टी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे.
पाटोला तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ)या अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीला विचरणा नदीवरील रामेश्वर साठवण तलावातील पाण्यामुळे 20 वर्षापासुन अगोदरची 5-6 वर्ष ट्रकच्या ट्युबमध्ये हवा भरून त्यावरून तर त्यानंतरची 15 वर्षे थर्मोकोलवरून चप्पद्वारे वाहतुक करावी लागत असे, गेल्या 6-7 महिन्यापासुन मुंबईतील बांद्रेवाडीकर गणेशोत्सव मित्रमंडळाने दिलेल्या तराफ्यावरून वाहतुक करत आहेत. शिंदेवस्तिवर 4 थी पर्यंत जिल्हापरिषद प्राथमिक शाळा असुन नंतर सौताड्याला तलावातुन प्रवास करूनच जावे लागते, भाजीपाला, दुधदुभते, किराणा, दवाखाना सर्वगोष्टींसाठी तलावातील पाण्यातुन जिवघेणा प्रवास करूनच जावे लागते.

15 ऑगस्टला रामेश्वर साठवण तलावात आक्रोश आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे
गेल्या वर्षभरापासून वारंवार जिल्हाधिकारी, उपविभागीय आधिकारी कार्यालय पाटोदा, तहसिल कार्यालय पाटोदा याठिकाणी निवेदन, आंदोलन केल्यानंतर तसेच 2 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे धरणे आंदोलन करून सुनिल केंद्रेकर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर आढावा बैठकीत विचारविनिमय करून प्राधान्याने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, त्याला 8 महिने होत असून प्रश्न न मार्गी लागल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रामेश्वर साठवण तलावात उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल लेखी निवेदन दिले आहे.