बातम्या
FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी

सोयगाव नगरपंचायतीवर नामनिर्देशन सदस्यांमध्येही शिवसेनेचीच बाजी ,दोघांची बिनविरोध निवड

सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील– सोयगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य नामनिर्देशित पदाच्या निवडीसाठी मंगळवारी पीठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली,दोन्ही पदांसाठी शिवसेनेचेच दोन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याने या दोन्ही पदांवर शिवसेनेनेच बाजी मारल्याने शिवसेनेचे अशोक खेडकर,लतीफ शहा यांची बिनविरोध निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली.यावेळी सभागृहात शिवसेनेच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी,उपनगराध्यक्षा सुरेखाबाई काळे यांचेसह पंधरा सदस्यांची उपस्थिती होती.

नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीनंतर मंगळवारी स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशित पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे दोन्ही उमेदवार बिनविरोध आले आहे.त्यामुळे आता शिवसेनेच्या खात्यावर या दोन सदस्यांसह १७ संख्याबळ झाल्याने शिवसेना खंबीर बहुमतावर आली असून भाजपाकडे दोन संख्याबळ आहे.मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी सभेचे कामकाज पहिले.

शिवसेनेचा तिसरा विजय-

सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेचा हा सलग तिसरा विजय झालेला असून या आधी निवडणुकीत अकरा जागांवर विजय मिळवून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदही बिनविरोध हातात घेवून स्वीकृत सदस्यांमध्येही शिवसेनेनेच बाजी मारली आहे.त्यामुळे शिवसेनेचा नगरपंचायत निवडणुकीत हा सलग तिसरा विजय मानल्या जातो.