बातम्या
FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी

ढेकणमोहा: डोक्यात दगड घालून मजुराचा खून

आठवडा विशेष टीम –
रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालहून आलेले आहेत 11 मजूर
बीड: दारू पिल्यानंतर दोन मजुरात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन नंतर हाणामारीत होऊन झोपेत असलेल्या एका 48 वर्षीय मजुराच्या डोक्यात दुसर्‍या मजुराने दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना ढेकणमोहा येथे घडली. मजूर रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधून आलेले आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या ढेकणमोहा येथे रेल्वे पटरीचे काम सुरू आहे. याचे टेंडर पश्‍चिम बंगाल येथील सुशांत सुनिल मंडल यांनी घेतलेले आहे. काम करण्यासाठी त्यांनी पश्‍चिम बंगाल येथून अकरा मजूर आणलेले आहेत. हे सर्व मजूर ढेकणमोहा येथेच राहतात. रात्री हैदरअली तरफदार पिता अब्दुल होसाईन व सिमूल बिस्वास पिता निपेंद्रनाथ बिस्वास (रा. नारायणपूर, कटलबागल, ता. दत्तपुलिया जि. नादिया (पश्‍चिम बंगाल)) या दोघात वाद निर्माण झाला होता. या वादातून हैदर अली याने शिमूल याच्या नाकावर बुक्की मारली होती आणि त्यातून रात्री शिमूल याने हैदर अली तरफदार पि. अब्दुल होसाईन (वय 48, रा. पश्‍चिम बंगाल) याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. या घटनेनंतर रात्री दोन वाजता शिमूल याने आपण हैदरअली तरफदार याचा खून केल्याची कबुली गुत्तेदार सुशांत मंडल यांना दिली. त्यानंतर याची माहिती मंडल यांनी पिंपळनेर पोलिसांना दिल्यानंतर ठाण्याचे प्रमुख पीआय आघाव, पीएसआय ढाकणे, पीएसआय खरात, कडुळे, बिट अंमलदार गर्जे, सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला प्रकरणाची फिर्याद सुशांत सुनिल मंडल यांनी दिली असून त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.