बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी करून गांधीगिरि आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह मोठ्याप्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर किंमत वाढवुन महागाई वाढवण्याच्या धोरणाच्या तसेच शेड्यूल ड्रग्स श्रेणीतील ८०० औषधांच्या १० टक्क्यांनी किंमती वाढविण्यास दिलेली मंजुरीच्या निषेधार्थ व वाढीव किंमती तात्काळ कमी करण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन चुलीवर खिचडी बनवुन प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन करत केंद्र सरकारच्या दर वाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अड.करूणा टाकसाळ, रामनाथ खोड, शेख युनुस च-हाटकर, हमीदखान पठाण,अशोक कातखडे, नितिन सोनावणे, डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, सय्यद आबेद, अंकुश दहे, आदि सहभागी आहेत.
केंद्र सरकारने दि.२३ मार्च २०२२ रोजी पासुन पेट्रोल-डिझेल सह एलपीजी गॅस प्रति सिलेंडर ५० रू किंमती वाढवल्यामुळे महागाईत भर पडली असून सर्व सामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर याचा परीणाम होत असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून केंद्र शासनाच्या दरवाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ व वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात
अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे, शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, डाॅ.संजय तांदळे, नितिन सोनावणे,आदिंनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांना केली आहे.

औषधांचे वाढीव दर तात्काळ कमी करावेत:-डाॅ.गणेश ढवळे
____
दि.१ एप्रिल २०२२ पासुन सामान्य आजारापासुन ते गंभीर स्थितीतील रूग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी ८०० औषधे महागणार असून त्यात तापेच्या पैरासिटामोल पासुन कोरोना,हद्यरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग, त्वचारोग, अनिमिया, कर्करोग, वेदनाशामक आदि वरील उपचारांसाठी “शेड्यूल ड्रग्स ” श्रेणीतील औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र सरकारने दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढल्यामुळे जगणंच महाग होणार आहे त्यामुळेच वरील वाढीव दर घटविण्यात यावेत.

चुलीवरचे जेवण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनकर्त्यांना
_____
गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवरील जेवण आंदोलन दरम्यान बनवण्यात आलेले खिचडी, मठ्ठा आदि जेवण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना स्नेह भोजन देण्यात आले.