बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या मसेवाडीकरांनी रस्ताच जेसीबीने खोदला ,रास्ता रोकोचा ईशारा – डाॅ.गणेश ढवळे

बीड (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत रा. मा. ५६ ते मुळुकवाडी-मसेवाडी रस्ता सुधारणा काम लांबी ०/०० ते २/८०० पॅकेज क्रमांक RDBEE-23,कामाची अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख रूपये असुन मे. रूद्रा कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंत्राटदारामार्फत करण्यात येत असेलेल काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ठीकठीकाणी अर्धवट असुन गावातील एका धनदांडग्याच्या सांगण्यावरून ईतर ग्रामस्थांना वेठीस धरून मनमानी कारभार करत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाप्रशासनातील आधिका-यांना लेखी तक्रार करून सुद्धा कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेरीस आज दि.८ एप्रिल रोजी सकाळी वैतागलेल्या ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गावात जाणारा रस्ताच खोदुन ठेकेदार व प्रशासनाचा निषेध नोंदवला.

गुरूवार रोजी मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

साधारणतः २०१५ मध्ये मुळुकवाडी ते मसेवाडी या रस्त्याचे सुधारणा काम २५ लाख रूपये खर्च करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. (औरंगाबाद)यांच्या मार्फत करण्यात आले होते त्यानंतर सध्या १ कोटी २६ लाख रूपये किंमतीचे काम सुरू असून काम बोगस असुन गावातील सिमेंट रस्त्यासाठी एक्सपायरी डेटचे सिमेंट वापरल्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्याचबरोबर अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसुन मनमानी पद्धतीने रस्ता वळवुन काम होत असल्याच्या निषेधार्थ जेसीबीने रस्ताच खोदला असुन गुरूवार रोजी मुळुकवाडी फाट्यावर मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर गुरूवार रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा मसेवाडीकरांनी दिला आहे.

निकृष्ट रस्त्याप्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते: डाॅ.गणेश ढवळे

_____
मुळुकवाडी-ते मसेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येत असलेल्या बोगस रस्त्याचे काम ठेकेदार आणि प्रशासकीय आधिकारी संगनमतानेच करत असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते.