बातम्या
FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी

वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल

सोयगाव,दि.१७: अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यां ढम्पर चा फोटो व व्हिडीओ शूटिंग केल्याचा संशय घेत एका दैनिकाच्या पत्रकारवर वाळू माफियाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार जखमी झाला असून, पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर गजमल इंगळे असे पत्रकार यांचे नाव असून, अमोल हिरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

ईश्वर गजमल इंगळे हे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात बातमीबाबत माहिती घेण्यासाठी जात असताना, अमोल हिरे याने त्यांना अडवून माझ्या ढमंपरचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग का केली असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांनतर चापट-बुक्क्याने मारहाण करत तू पत्रकारिता कशी करतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आपल्याला जीवाला धोका असल्याची तक्रार देत इंगळे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून या घनटेचा निषेध करण्यात येत आहे.

आज पत्रकार संघटनेच्या वतीने निदर्शने-

वाळू माफियांकडून पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी दि.१८ तहसील कार्यालयासमोर या घटनेच्या निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली आहे.याबाबत सोमवारी सोयगाव पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी विजय कुमार मराठे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा-

पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *