बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधन वाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात मार्गी लावू―पंकजा मुंडे

पंकजाताई मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला विश्वास

मुंबई:आठवडा विशेष टीम― राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला आज दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधन वाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ द्यावी, सेवा निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद, कामावरील वेळेची मर्यादा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताई मुंडे यांची राॅयलस्टोन निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी संघटनेच्या पदाधिका-यांशी त्या बोलत होत्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले. बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. मानधन हे कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाही. त्यामुळे म्हातारपणी औषधोपचाराचा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांना एक हजार ५०० रूपये, मदतनीसांना ७५० रूपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रूपये मानधन वाढ जाहीर केली आहे, ती वाढ लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असून लवकरच हे वाढीव मानधन मिळेल असा विश्वास ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, शुभांगी पालशेतकर आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *