बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बीड: पाटोद्यात महिला दिनाला काळीमा फासणारी घटना; पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर बलात्कार

  • महिला दिनी रक्षकच बनले भक्षक; पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदाराचे घृणास्पद कृत्य
  • पीडित महिलेची तक्रार दाखल; आरोपी पोलीस कर्मचारी अटकेत

पाटोदा (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी पाटोदा शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या घृणास्पद कृत्याने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी एका महिलेला महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पाटोदा शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेचा तपशील:

गेवराई तालुक्यातील एक महिला काही कामांसाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येत-जात असे. यादरम्यान, तिची बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यात मोबाईलवर संभाषण आणि संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत उद्धव गडकर यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून त्या महिलेला पाटोद्यात बोलावले. महिलेला स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, गडकर यांनी तिला खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

पीडित महिलेची तक्रार आणि पोलिसांची कारवाई:

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेने पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांकडे तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुंडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट दिली आणि तपासाच्या सूचना दिल्या. सायंकाळी ६:३० वाजता पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठवण्यात आले. उद्धव गडकर यांच्याविरोधात गुन्हा क्र. ७७/२०२४ भा.दं.वि. कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव साहेब या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शहरात संतापाची लाट:

या घटनेनंतर पाटोदा शहरात संतापाची लाट उसळली आहे. ‘रक्षकच भक्षक’ बनल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *