पाटोदा: पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत श्री.साईलिला भारत गॅसच्या वतिने तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शन वाटप

पाटोदा: आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील गोरगरीब कुटुंबाना पंडित दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत महिलांना नागपंचमी सनाचे औचित्य साधुन महिलांना साईलिला भारत गॕस ग्रामीण वितरक एजन्सी पाटोदा यांच्या वतिने 5 ऑगस्ट 2019 रोजी पाटोदा शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत नागपंचमीचे औचित्य साधून शेकडो महिलांना मोफत गॕस कनेक्शनचे पाटोदा तहसिलचे तहसिलदार गणेश जाधव यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटोदा तलाठी कार्यालयाचे तलाठी नागरगोजेसाहेब तर प्रमुखपाहुणे म्हणून नगरपंचायतचे पाणीपुरवठा अधिकारी मिसाळसाहेब तसेच सुरेश आण्णा धस यांचे शासकीय स्विय सहाय्यक सुशिल ढोले,पञकार गणेश शेवाळे, गोदाम किपर मिसाळसाहेब, बडेसाहेब,पञकार सचिन शिंदे होते यानंतर राहुल कांकरिया यांनी पंडित दीनद्यायल उपाध्याय योजना बदल महिलाना माहिती सांगितली यानंतर वरिल सर्व मान्यवराच्या हास्ते शेकडो महिलांना मोफत गॕस कनेक्शन वाटप करण्यात आले या कार्यक्रमास तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अयोजन साईलिला भारत गॕस एजन्सी पाटोदा यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवराचे आभार राहुल कांकरिया यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.साईलिला भारत गॕस एजन्सीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.