बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

महावितरणच्या ढिसाळ कारभारावर गणेशभक्तांची मात! लिंबागणेश मंदिरात रात्रीतून प्रकाश; गावकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक

लिंबागणेश, ८ जून २०२५: अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या गणपती बाप्पाचं मंदिर चार दिवस अंधारात असल्याचं धक्कादायक वास्तव लिंबागणेश (जि. बीड) येथून समोर आलं आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटूनही महावितरणच्या गलथान कारभारामुळे मंदिराला अखंड चार दिवस अंधाराचा सामना करावा लागला. मात्र, महावितरणला घाम फुटण्याऐवजी, गावातील गणेशभक्तांनीच एकजुटीने पुढाकार घेत रात्रीतून वीजपुरवठा पूर्ववत करत एक आदर्श निर्माण केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात बाभळीचं एक झाड कोसळल्याने लिंबागणेश येथील गणपती मंदिराला वीजपुरवठा करणारी मुख्य तार तुटली होती. यामुळे मंदिर परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात होता. गावकऱ्यांनी याबाबत महावितरणच्या स्थानिक उपकेंद्राशी संपर्क साधला असता, प्रभारी उप अभियंता अभिजित शिंदे यांनी केवळ ‘लाईनमन यांना तार जोडण्यासाठी सांगितले आहे’ एवढंच तोकडं उत्तर देत वेळ मारून नेली. या गंभीर समस्येकडे महावितरणने केलेल्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

काल सायंकाळी गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर (सोशल मीडिया) याविषयी एक पोस्ट पडल्यानंतर, गावातील हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी, सौरभ जोशी आणि देवस्थानचे पुजारी श्रीकांत जोशी या गणेशभक्तांनी तात्काळ यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी गावातील खाजगी विद्युत पोल दुरुस्तीचे काम करणारे उद्योजक अंकुश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.

भक्तांच्या एकजुटीने विजयाचा प्रकाश:

अंकुश गायकवाड यांनी कोणताही विलंब न लावता, आपले सहकारी आश्रुबा गायकवाड, श्रीराम गायकवाड, अजय गायकवाड, आदित्य गायकवाड, कृष्णा जाधव, सुरज गायकवाड, मयूर कुदळे यांच्या समवेत रात्री ९ वाजेपर्यंत घटनास्थळी धाव घेतली. ‘गणपती मंदिर अंधारात राहू नये’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी कोणतंही शुल्क न घेता तुटलेली तार जोडून वीजपुरवठा पूर्ववत केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कामात महावितरणचे लाईनमन आमीर सय्यद यांनी रात्रीच्या वेळी तातडीने परमिट देऊन मोलाचं सहकार्य केलं, ज्यामुळे भक्तांना काम पूर्ण करणं शक्य झालं.

एकंदरीत, महावितरणच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गणेशभक्तांनी दाखवलेली एकजूट आणि प्रसंगावधान यामुळेच लिंबागणेश मंदिराला पुन्हा प्रकाश लाभला. हा केवळ वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रश्न नसून, प्रशासकीय ढिलाईवर समाजशक्तीने मिळवलेला विजय आहे, असं डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केलं. या घटनेमुळे गावातील एकोपा आणि समाजोपयोगी कार्यासाठी गावकऱ्यांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *