चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर!

पाटोदा (प्रतिनिधी) जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणं, त्यांच्या अडचणीला तत्परतेने धावून जाणं आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत झटणं, हेच कार्य पद्धतीत ठेवणारे भाऊसाहेब आण्णा भवर आज जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. “जनतेसाठी सदैव तत्पर” हे त्यांचे घोषवाक्य गावागावात घुमू लागले आहे.गावकऱ्यांच्या मुलभूत सुविधा, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्यांवर ते नेहमी पुढाकार घेतात. पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं असो वा सामान्य माणसाच्या हक्काचा लढा लढणं असो – भाऊसाहेब भवर यांनी दाखवलेली धडाडी उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जिल्हा परिषद गटाच्या हद्दीत भाऊसाहेब भवर यांनी सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, तरुणांसाठी विविध उपक्रम अशा अनेक विषयांवर त्यांनी पुढाकार घेऊन लोकांचा विश्वास संपादन केला आहे.स्थानिक नागरिक सांगतात की, “भाऊसाहेब आण्णा भवर हे खर्या अर्थाने २४ तास जनतेच्या सेवेत असतात. रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी मदतीसाठी त्यांच्याकडे धाव घेता येतं, हीच त्यांची खरी ताकद आहे.”आजच्या स्पर्धात्मक राजकारणात जनतेशी निगडित प्रश्नांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत, सेवेला सर्वोच्च स्थान देणारे भाऊसाहेब भवर हे तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.