बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रविणोत्सव’ चा जल्लोष

 

भाईंदर स्थित एस. एन. एज्युकेशन ट्रस्टच्या प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रविणोत्सव’ २०२६ म्हणजेच क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्ध्येचे आयोजन दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२६, शुक्रवार व शनिवार रोजी करण्यात आले. स्पर्ध्येमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांचे नैपुण्य व सुप्त गुणांचा जल्लोष प्रत्ययास आला.
या वर्षी भाईंदर स्थित प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महावियालयामध्ये तृतीय “प्रविणोत्सव २०२६” सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेचे क्रिडा प्रकारातील उद्घाटन दिनांक १३ फेब्रुवारी,शुक्रवार रोजी मा.डॉ. सचिन बांगर (उपायुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका), मा. श्री. योगेश गुंजाळ (सहाय्यक आयुक्त), मा.श्री. रोहिदासजी पाटील (संस्थापक, अध्यक्ष एस. एन. एज्युकेशन ट्रस्ट), मा. श्री. महेशजी म्हात्रे (सचिव), सौ. रंजना पाटील (सीईओ), डॉ. देवीचंद राठोड (प्राचार्य), यांच्या उपस्थितीत पार पडला. मा. डॉ. सचिन बांगर सरांनी सहभागी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये नवीन संधी व क्रिडा स्पर्धेचे महत्त्व तसेच वैयक्तिक आयुष्यातील यश संपादन करण्याची प्रेरणा दिली. मा.श्री.रोहिदासजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयाविषयी माहिती देऊन महाविद्यालयाची गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेण्याची अभिलाषा व्यक्त केली. त्याचबरोबर स्पर्धकांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.
“प्रविणोत्सव २०२६” या स्पर्धेमध्ये मुंबई परिसरातील सुमारे १५० महाविद्यालयीन संघानी सहभाग नोंदवून जवळपास ७०० विद्यार्थ्यानी आपले प्राविण्य दाखविले. सदर स्पर्धा नृत्य, गायन, सामुहिकनृत्य व क्रीडा स्पर्धा, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, रांगोळी, नेलं आर्ट, पथ नाट्य. टॅटू, रस्सी खेच या विभागामध्ये झाली. स्पर्ध्येमध्ये परीक्षक म्हणून परिसरातील नामवंत कलाकार आणि खेळाडू यांची उपस्थिती लाभली.
“प्रविणोत्सव २०२६” सांस्कृतिक स्पर्धा प्रकार ‘युगांतर’ या शीर्षकाखाली संपन्न झाला. दिनांक १४ फेब्रुवारी,शनिवार रोजी पार पडलेल्या भव्य सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन माननीय नवनियुक्त उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील याच्या उपस्थित संपन्न झाला. आपल्या भाषणामध्ये मा, उपमहापौरांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रोहिदासजी पाटील यांचे मिरा भाईंदर परिसरातील समाजसेवेचे व्रत अभिप्रेरित करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्ध्येमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांचे नैपुण्य व सुप्त गुणांना प्रेरणा मिळाली. प्रथम विजेत्यास रोख रक्कम ४,०००/-, व्दितीय विजेत्यास रोख रक्कम २,०००/- स्मृतीचिन्हे व पारितोषिके देवुन गौरविण्यात आले. स्पर्ध्येच्या यशस्वी आयोजन करिता सीईओ सौ. रंजना पाटील आणि प्राचार्य डॉ. देवीचंद राठोड यांनी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे कौतुक केले. वरील उपक्रम विद्यार्थी परिषद अध्यक्ष कु. श्रेयश पवार, सांस्कृतिक सचिव कु. दिशा चव्हाण, क्रिडा सचिव कु. प्रथमेश ढगे, इंनोवेटिक सचिव कु. रीटम सामंता, कु. तेजस सोबन व इतर विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरीत्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ. प्रिती तिक्कस (सांस्कृतिक सेल समन्वयक), श्री.संजीतकुमार सिंग (क्रिडा सेल समन्वयक) व सूत्र संचालन प्रा. अनिल भटकर यांनी उत्तमरित्या पार पाडले.