बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

बीड: श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानात महाशिवरात्रीचा उत्साह; महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

बीड, १५ फेब्रुवारी (विशेष प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीत असलेल्या बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी भाविकांचा मोठा जनसागर लोटला. परिसरातील हजारो भाविकांनी बेलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात, तसेच दर्शन मंडप आणि संपूर्ण मंदिर परिसरात फुलांच्या आकर्षक माळा आणि लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे मंदिराचे रूप अधिकच विलोभनीय दिसत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी संस्थानचे मठाधिपती महंत महादेव भारती महाराज आणि शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने स्थानिक मंडळे आणि स्वयंसेवकांच्या वतीने भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि केळीचे मोफत वाटप करण्यात आले.

वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लिंबागणेश पोलीस चौकीच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड, गणेश परझने यांच्यासह होमगार्डचे जवान मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात होते.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिरात सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडेल. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. परिसरातील सर्व भाविकांनी या कीर्तन आणि महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन बेलेश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.