विद्यापीठ नामविस्तार लढा ही लोकचळवळ होती―प्रा.पी.वाय.फुलवरे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त प्रा.पी.वाय.फुलवरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवासावर सविस्तर भाष्य करून खडतर शिक्षण प्रवासाचे वास्तववादी रूप उपस्थितांसमोर ठेवले. विद्यापीठाच्या नामविस्ताराची चळवळ ही दलितेत्तर व दलित या दोघांचीही होती किंबहुना विद्यापीठ नामविस्तार लढा ही लोकचळवळ झालेली होती.यात बीड,नांदेड जिल्ह्याचे योगदान हे विशेष व महत्वाचे राहिले आहे. अनेक दलित तरूणांनी नामांतर लढ्यात बलिदान दिलेले आहे.14 जानेवारी 1994 रोजी नामांतर लढ्याला यश आले. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद असा झाला.डॉ. बाबासाहेबांचा व्यासंगीपणा आणि चिंतनशीलता अंगीकारून विद्यार्थ्यांनी,प्राध्यापकांनी अध्ययन,अध्यापन करावे असा विचार देवून,डॉ.बाबासाहेबांचे नांव आपल्या विद्यापीठाला मिळाले.आपल्या लढ्याला मिळालेले हे यश आहे.असे प्रतिपादन प्रा.फुलवरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. वनमाला रेड्डी या होत्या तर यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे,प्रा.प्रताप जाधव,संयोजक डॉ.सुरेवाड संजय यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. वनमाला रेड्डी म्हणाल्या की, एका विद्वान,व्यासंगी,अभ्यासू संशोधकाचे नांव आपल्या विद्यापीठाला मिळाले.हे निश्चितच एका महान विचारवंताचा झालेला गौरवच आहे.सर्व विद्यार्थी,प्राध्यापकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शाने आपली वाटचाल करावी असे सांगून.समाजाने हाती घेतलेली चळवळ यशस्वि झाली.या लढ्यामध्ये अनेकांना वीरमरण आले.परिस्थितीवर मात करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला.अशी माहिती प्राचार्या डॉ.रेड्डी यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मुकुंद राजपंखे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.शैलेश जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.संजय जाधव यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारीवृंद यांचे सहीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.