बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

अंबाजोगाईच्या ग्रामीण रूग्णालयासाठी मुंडे भगिनींचे लाखमोलाचे योगदान―भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे प्रतिपादन

आदर्श संविधान डोळ्यांसमोर ठेवुन देशाची प्रगतीकडे वाटचाल

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापीत केलेल्या आदर्श संविधानाच्या आधारावर देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असुन
देशात संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असुन अंबाजोगाई ग्रामीण रूग्णालयासाठी पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई यांनी दिलेले योगदान कधीच न विसरणारे आहे.आरोग्याचे मंदिर उभारण्यासाठी पाच वर्षांत या भगिनींनी अथक परिश्रम केले असुन अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांच्यामुळे ग्रामीण रूग्णालय शिस्तीच्या चौकटीत चालत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा अभ्यागत मंडळाचे सदस्य राम कुलकर्णी यांनी केले.

येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सुरूवातीला अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर एका वर्षांत महाविद्यालय आणि रूग्णालयातील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना कौतुकास्पद प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी अभ्यागत मंडळाचे सदस्य नगरसेवक कमलाकर कोपले, डॉ.राकेश जाधव,डॉ.कचरे, डॉ.बगाटे आदी मान्यवरांसह डॉक्टर्स, सहयोगी प्राध्यापक, परिचारिका, सर्वस्तरांतील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.या कार्यक्रमात बोलताना राम कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सण हा संकल्प दृढ निश्चयासाठी महत्वाचे असतात.प्रत्येकाने काम करताना आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखुन योगदान दिले तर खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीत समर्पण होवु शकते.वर्तमानकाळात भारत देश प्रगतीच्या दिशेने जात असुन आदर्श संविधानाचे काटेकोर पालन होत असल्याचे त्यांनी सांगितले.या रूग्णालयासाठी सत्तेत असताना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जवळपास 150 कोटींपेक्षा अधिक रूपायाचा निधी देवुन रूग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत.हे रूग्णालय सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य मंदिर असुन संवेदन भावनेतुन मुंडे भगिनींनी रूग्णालयात केलेला विकास आम्ही कधीच विसरू शकत नाहीत.बीड जिल्ह्याला डॉक्टर खासदार असल्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर इथेच झाला असुन एमसीआयच्या जागाही वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात बोलताना कुलकर्णी म्हणाले की,डॉ.सुधिर देशमुख यांच्या अथक परिश्रमामुळे हे रूग्णालय महाराष्ट्रात नावलौकिकास आल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी बोलताना डॉ.सुधीर देशमुख यांनी रूग्णालय विकासाचा आढावा घेताना तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई आणि खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांचा आवर्जुन उल्लेख केला.त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे रूग्णालय पुढे गेल्याचे सांगुन त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाला धन्यवाद दिले.एक वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करणारे औपचारिक भाग म्हणुन त्यांचे आम्ही कौतुक करतो.पण,या सरस कामगिरीसाठी सर्व विभागातील मंडळी पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स,परिचारिका,सेवक, कर्मचारी,सुरक्षा रक्षक आदींची उपस्थिती होती.