बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविणार्‍या गुणीजणांचा प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सत्कार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विविध क्षेत्रात कार्य करून अंबाजोगाईचा नांवलौकिक सर्वदूर वाढविणार्‍या गुणीजणांचा बीड जिल्हा काँग्रेसचे व प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते मंगळवारी हृद्य सत्कार करण्यात आला.

शहरातील प्रशांतनगर येथील सहकार भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेसचे व प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी तर प्रमुख अतिथी म्हणुन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेविका सौ.संगीताताई व्यवहारे,नगसेवक वाजेद खतीब,नगरसेवक अमोल लोमटे,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,सुनिल व्यवहारे,
विजय रापतवार,अंबाजोगाई पीपल्स बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.या कार्यक्रमात अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापतीचे सुपुञ प्रा.प्रशांत जगताप,उपसभापती अलिशान पटेल यांचे वतीने पटेल सर, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून लोककार्य करणारे रामकिसन मस्के यांना बीड येथील जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच प्रा.संतोष मोहिते यांना आंतरभारतीचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि प्रा.अनंत कांबळे यांना महाराष्ट्र शासन आयोजित कामगार राज्य नाट्य स्पर्धेत “फतवा” नाटकात अभिनयासाठी पारितोषिक मिळाल्याबद्दल,या सोबतच नवकेशर आकादमीचे वीरश्री डाके,वैष्णवी शिंदे,ईश्‍वरी कराड,अथर्व जोशी,प्रांजल वाघमारे,यशश्री भोसले,योगेश्‍वरी टुरके या विद्यार्थ्यांनी नुकत्याच सिंगापुर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भारताचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा ही शाल,फेटा व पुष्पगुच्छ देवून यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सत्कार केला.याप्रसंगी अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापतीचे सुपुञ प्रा.प्रशांत जगताप, उपसभापती अलिशान पटेल यांचे वतीने पटेल सर,शिक्षक रामकिसन मस्के,प्रा.संतोष मोहिते,प्रा.अनंत कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार राणा चव्हाण यांनी मानले.

अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविणा-या गुणीजणांचा सार्थ अभिमान-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रात नांवाजलेले आहे. अंबाजोगाईतील प्रज्ञावान व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून शहराचे नांव वेळोवेळी उंचावलेले आहे. राजकिय व शैक्षणिक क्षेत्रात अनुक्रमे प्रा.प्रशांत जगताप व पटेल सर यांचे कार्य उल्लेखनिय आहे.शिक्षण क्षेत्रात राहुन समाज प्रबोधनकार म्हणुन रामकिसन मस्के यांची ओळख आहे.आंतरभारती व रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रा.संतोष मोहिते यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.प्रा. अनंत कांबळे यांनी शिक्षण तसेच नाट्य क्षेत्रात उल्लेखनिय यश मिळविले आहे.या सोबतच नवकेशर नृत्य आकादमीचे भिमाशंकर शिंदे यांनी घडविलेले अंबाजोगाईचे विद्यार्थी हे नृत्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल कामगिरी करीत आहेत.सिंगापुर येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी विजेत्या सर्व स्पर्धकांचा आणि या गुणीजणांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी हा कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या मान्यवरांच्या कार्याची प्रेरणा घेवून इतरांनी प्रेरीत व्हावे.हाच या मागचा विधायक उद्देश असल्याचे प्रतिपादन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.