बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली – धनंजय मुंडे

मुंबई/बीड (दि.२९):आठवडा विशेष टीम― राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (वय – ५७) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्यातील अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्याच्या संत परंपरेतील अत्यंत मानाचे नाव, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरत बुवा रामदासी यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे व्यक्त करतच धनंजय मुंडे यांनी ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भरतबुवा हे अलीकडील काळातील नारदीय व सांप्रदायिक अशी दोन्ही प्रकारची कीर्तने व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी बीड जिल्ह्यातच नव्हे ते सबंध राज्यात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी मोठमोठे किर्तन महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केले. समाज प्रबोधनासह माणसे जोडण्याची उत्तम कला भरत बुवांना प्राप्त होती.

मितभाषी, अत्यंत संयमी स्वभाव, नम्र वृत्ती ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अध्यात्मातील त्यांचा गाढा अभ्यास, अभंगवणीवर असलेले प्रभुत्व त्यांना राष्ट्रीय किर्तनकार ही उपाधी देऊन गेले. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता.

मूळ बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते. प्रचंड व्यासंग, अभ्यासपूर्ण मांडणी, साहित्य, इतिहास, संतसाहित्य तसेच इतिहास कालीन विषयावर त्यांची हजारो कीर्तने गाजलेली आहेत.

आज त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी दिलेला शब्दांचा अनमोल ठेवा पुढील अनेक पिढ्याना जगण्याची दिशा देत राहील. किर्तनरुपी सेवेतून त्यांनी दिलेले योगदान आम्ही स्मरणात ठेवू. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपण रामदासी कुटूबीयांच्या व जिल्ह्यातील शोकसागरात बुडालेल्या समस्त वारकरी संप्रदायाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ०१) सकाळी ९.००वा. बीड शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.