बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

अंबाजोगाई पिपल्स बँकेकडे मार्च-2020 अखेर 397 कोटी 64 लक्ष रूपयांच्या ठेवी ; 2 कोटी 11 लाखांचा नफा- चेअरमन राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात नांवारूपास आलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे 31 मार्च 2020 अखेर सुमारे 397 कोटी 64 लाख रूपयांच्या ठेवी आणि बँकेस 2 कोटी 11 लाखांचा रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.बँकेच्या मुख्य कार्यालय,2 विस्तारीत कक्ष यासह 16 शाखांचा विस्तार झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि तरूण उद्योजकांना अर्थपुरवठा करण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 1996 साली स्थापना करण्यात आली.या बँकेने लघुउद्योगांसाठी तात्काळ कर्जपुरवठा करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सहकार्य केले.ही बँक आज खऱ्या अर्थाने आधारवड ठरली आहे.बँकेच्या मुख्य कार्यालय,2 विस्तारीत कक्षासह 16 शाखांचा विस्तार करण्यात आला आहे.अंबाजोगाई,विस्तारित कक्ष अंबाजोगाई, जोगाईवाडी (अंबाजोगाई), बीड,सिरसाळा,औरंगाबाद शहर,औरंगाबाद सिडको, जालना,अहमदनगर,औसा, उदगीर,कळंब,जामखेड, गेवराई,माजलगाव,वाघोली (पुणे),लातुर या सर्व सोळा शाखा व दोन विस्तारीत कक्ष कार्यरत आहेत.बँकेच्या वतीनेे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे की,सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावता येते.सामाजिक बांधिलकी मानुन ही बँक काम करीत आहे.याच उद्देशाने आमचे श्रद्धास्थान असणारे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी व दिवंगत नेेते माजी आ.बाबुरावजी आडसकर साहेबांनी त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे अंबाजोगाई पिपल्स बँक आज खऱ्या अर्थाने प्रगतीकडे झेपावते आहे.1996 साली लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे.या बँकेेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालय संपुर्णपणे संगणकीकृत असून रूपे एटीएम कार्ड सुविधा, तात्काळ सोने तारण कर्ज, ठेवीवर ठेव वीमा योजने अंतर्गत विमा संरक्षण,जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते. वाहन कर्ज,गृह,वैयक्तिक, लघुउद्योग व औद्योगिक कर्ज देण्यात येते.सेफ डिपॉझिट लॉकर्स, आरटीजीएस,एनईएफटी, बँकेच्या सर्व शाखेतील ग्राहकांना एसएमएस बँकिंग सुविधा यासहित विविध ठेव योजना बँकेच्या सुरू आहेत.ग्राहक हेच आपले दैवत मानुन तत्पर व विनम्र सेवा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीने केला जात आहे.31 मार्च 2020 अखेर बँकेची सभासद संख्या 10985 एवढी आहे. बँकेकडे 397 कोटी 64 लाख रूपयांच्या ठेवी आहेत.बँकेने 203 कोटी 6 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.बँकेकडे 11 कोटी 8 लाखांचे वसुल भागभांडवल असून 27 कोटी 79 लाख रूपयांचा स्वनिधी आहे.बँकेने 208 कोटी रूपयांची गुंतवणूकही केली आहे.बँकेस 31 मार्च 2020 अखेर 2 कोटी 11 लाख रूपयांचा नफा झाला आहे.बँकेने दुष्काळी परिस्थिती असताना व कोरोना विषाणु साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वसुलीत सातत्यपूर्ण प्रयत्न करून बँकेचा नेट एनपीए 7.61 एवढा ठेवण्यात बँकेला यश आले आहे.तरी ही पुढील काळात बँकेचा एनपीए कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करू अशी माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.सध्या अंबाजोगाई,जोगाईवाडी,
मोरेवाडी,सिरसाळा,औसा , लातूर,कळंब,वाघोली या
शाखेत एटीएमची सुविधा उपलब्ध आहे.बँकेच्या इतर शाखांमध्येही लवकरच एटीएम सेवा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे.डाटा सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांसाठी कोअर बँकिंगव्दारे समाधानकारक सेवा देणे सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री खासदार ना.अशोकरावजी चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित विलासरावजी देशमुख,माजी मंञी आ. दिलीपरावजी देशमुख,आ. मुजफ्फरभाई हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पिपल्स बँक भरीव प्रगती करीत आहे.भविष्यात अंबाजोगाई परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी बँक आपले योगदान देणार आहे.बँकेचे सर्व सभासद,हितचिंतक, ग्राहक,ठेवीदार,कर्जदार आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.बँकेच्या सर्वांगीण वाटचालीत व विकासात व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,संचालक सर्वश्री प्रा.वसंतराव चव्हाण,अॅड.विष्णुपंत सोळंकेे,दत्तात्रय दमकोंडवार,अरुण काळे, पुरुषोत्तम चोकडा,शेख मेहमुद शेख दादामियाँ, मोहन कुलकर्णी,लक्ष्मण दासुद,सुरेश मोदी,श्रीमती सिमिंतीनी देशमुख,प्रा.सौ. रुक्मीणी पवार,सौ.रोहिणी पाठक,सुरेश देशपांडे, सचिन बेंबडे,मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड,सर्व अधिकारी,शाखधिकारी, कर्मचारी,पिग्मी एजंट यांचाही महत्वपूर्ण वाटा असल्याची माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.