बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

सतत दांडी बहादर पाटोदा नगरपंचायत सीईओच्या खुर्चीला सभापती राजू जाधव यांनी हार घालून केला निषेध

पाटोदा:गणेश शेवाळे―संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या उच्चाटना साठी सरकारने लॉकडाऊन करुन युध्द पातळीवर उपाययोजना चालु आहे .मात्र पाटोदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर राहत असल्याने सभापती राजु (भैय्या) जाधव व अन्य नगरसेवकांनी पंचनामा करुन खुर्चीला हार घातला व लिहले ‘ मी सी ई ओ सदा गैरहजर कोरोना च्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन आहे .प्रत्येक विभाग प्रमुखांनी मुख्यालयी हजर रहावे असे सक्त आदेश असतानाही पाटोदा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर राहात असल्याने पाटोदा नगरपंचायत क्षेत्रात कोणतीही उपाययोजना करता येत नाही .कोविड १९ च्या बाबतीत आतापर्यंत जे कामे झाली ती आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती राजु (भैय्या) जाधव , नगरसेवकांनी स्वनिधीतुन केली आहेत मात्र सीओ शशिकांत भोसले हे पाटोदा शहरास वा-यावर सोडुन बेपत्ता आहेत .लॉकडाऊन च्या सुरुवातीला उपविभागिय अधिकारी नम्रता चाटे ,तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकिसही भोसले हे गैर हजर होते .त्याही वेळी सीओ यांच्या गैरहजेरीचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते .पाटोदा नगरपंचायतने आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.नगरपंचायतचे कर्मचारीही असुरक्षित आहेत .बीड जिल्ह्यातील इतर नगरपंचायतने कोविड-१९ रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालु आहेत मात्र पाटोदा शहरात सीओ सतत गैरहजर राहात असल्याने कोणतीही उपाययोजना करता येत नाही .शशिकांत भोसले हे मुद्दामहुन गैरहजर राहात असल्याने आरोग्य सभापती राजु( भैय्या) जाधव यांनी निवेदन देऊनही काही सुधार नसल्याने .आज दि १७ रोजी. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आरोग्य सभापती राजु (भैय्या) जाधव , नगरसेवक यांनी त्यांच्या खुर्चीस हार घालुन लिहले मी सीई ओ सदा गैरहजर .व कक्ष अधिका-यांकडुन पंचनामा लिहीला तर पचंनाम्यावर नगरपंचायतच्या सर्व कर्मचा-यांच्या सह्या आहेत.