बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

अंबाजोगाई: मोरेवाडी येथे वसंतराव मोरे यांच्याकडून २०० गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

अंबाजोगाई:रणजित डांगे― संचारबंदी काळात गरजूंना व ज्यांचे हातावर पोट आहे असे समाज घटक यांना मदत व्हावी,दिलासा मिळावा याच विधायक भूमिकेतून येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते वसंतराव मोरे यांनी रविवार, दिनांक 26 एप्रिल रोजी मोरेवाडी येथील 200 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले.

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव मोरे यांच्या हस्ते मोरेवाडी गावातील 200 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. यावेळी गरजूंना गहू,साखर, तुरदाळ,रवा,चहापत्ती आणि अंगाचे साबण या जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्य कीट्सचे वाटप करण्यात आले आहे. वसंतराव मोरे हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेतात.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात.मोरेवाडीचे सरपंच असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासतात केलेली विविध विकासकामे मोरेवाडीकर अद्यापही विसरलेले नाहीत.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून मोरे यांनी नव्या पिढी समोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजुरी,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना मोरे कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे. मोरे आबा यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे. मोरेवाडीतील हातावर पोट असणा-या,मोलमजुरी करणा-या ज्यात नाभिक, सफाई कामगार,बारा बलुतेदार समाज बांधव,अनुसूचित जाती व जमाती समाज बांधव,घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्स’ पाळून,मास्क बांधून व रितसर यादी तयार करून घरपोहोच करण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच वसंतराव मोरे,शिवानंद मोरे, अप्पासाहेब मोरे,चंद्रकांत मोरे,पांडुरंग पांचाळ,संजय वाघमारे,शंकरराव कांबळे आदी मोजक्याच मान्यवरांची उपस्थिती होती.तर जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोहोच वाटपासाठी ज्ञानेश्वर मोरे,इंद्रजित मोरे,विकास मोरे,रवि भनगे,राजपाल मोरे,किरण मोरे,भागवत मोरे,बालाजी मोरे,संदीप मोरे,श्रीकांत मोरे,सुजीत धावरे,कैलास सवने,शुभम वाघमारे,बुद्धभुषण भडके, विशाल कांबळे,प्रशांत शिंदे,राजू काळे यांचे सहकार्य लाभले.

जनतेने शासनाच्या सुचनांचे पालन करावे

मोरेवाडी व अंबाजोगाई तालुक्यातील जनतेने शासनाने दिलेल्या सूचनांचेे तंतोतंत पालन करावे.गावामध्ये नवीन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच कुटुंबातील एकानेच दिलेल्या वेळेत घराबाहेर येऊन आपले काम झाले.की,तात्काळ घरी जावे.आपली व कुटुंबियांची काळजी घ्यावी.

-वसंतराव मोरे,(माजी सरपंच,मोरेवाडी.)

नोट-बातमी सोबत फोटो.