मध्यप्रदेशातील कामगार निघाले होते चालत ,आ.सुरेश धसांनी सरपंच अनिल ठोबळे यांना सांगून राहण्या खाण्याची केली सोय

आष्टी:अशोक गर्जे― कडा येथून मध्यप्रदेशामधील कामगारांना बस सेवा देण्यात आली 4 दिवसापूर्वी हे मजूर चालत गावी निघाले होते त्यावेळी अा.सुरेश धस यांनी त्या कामगारांची प्रशासनाच्या वतीने कडा येथे राहणे जेवण हे देण्यासाठी कडा येथील सरपंच अनिल तात्या ठोबळे यांना सांगून सोय केली होती. तहसीलदार मॅडम यांनी कडा तलाठी एन डी ए डी औंदकर यांना सांगून बस मध्ये बसून देण्याचे सांगितले व बुधवारी कडा एस टी स्थानकातून बसवून देण्यात आले या वेळी अनिल तात्या ढोबळे कोतवाल फिरोज सय्यद उपस्थित होते.