बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

छत्रपती संभाजी महाराज हे सर्वोत्तम राजपुत्र –राजकिशोर मोदी ; जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संबंध राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची प्रेरक यशोगाथा आजच्या युवकांसाठी आदर्शवत अशीच आहे.घराघरांत शिवचरित्रा नुसार संस्कार झाले.तर शिवशाहीचे उज्ज्वल दिवस पुन्हा दिसतील असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेसचेअध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराजांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करून बीड जिल्ह्यातील सर्व जनतेस शुभेच्छा देण्यात आल्या.

सहकार भवन येथे गुरूवार,दि.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रारंभी छञपती शंभुराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून मोदी बोलत होते.पुढे बोलताना मोदी म्हणाले की, छञपती शिवाजी महाराजांची किर्ती ही जगभर आहे.त्यांच्याच मुशीत तयार झालेले छत्रपती संभाजी महाराज यांनी आठरापगड मावळे व मुस्लिम बांधवांना सोबत घेवून औरंगजेब व स्वराज्याच्या शत्रुंना सळो की,पळो करून सोडणारे संभाजीराजे यांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुद्धभुषण हा ग्रंथ लिहिला.संपुर्ण आयुष्यात त्यांनी एकुण 120 लढाया लढल्या व सर्व लढाया जिंकल्या ते कायम अपराजित राहिले.या वरून त्यांचे शौर्य दिसून येते.बालसाहित्यीक म्हणुन संभाजी महाराजांनी बुद्धभुषण नखशिख,नायीका भेद,सात सतक आदी ग्रंस्थांचे लेखन केले.जंजीरा किल्ला जिंकण्यासाठी समुद्र बुजविला,जगातील पहिल्या बुलेटप्रुफ जाकिटाची निर्मिती केली.डोंगर पोखरून शेतीला पाणी पुरविले,आठ भाषांवर त्यांचे प्रबुद्ध होते ते वीर पराक्रमी योद्धे,बुद्धीमान,धाडसी, शुरवीर होते,निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न,प्रयत्नवादी, विज्ञानवादी,स्वाभिमानी आदी विविध गुणसंपन्न सर्वोत्तम राजपुत्र होते.त्यामुळे शंभुराजे यांच्या चरित्राचा आदर्श आजच्या पिढीने घेतला तर एक आदर्श,नितीमान,स्वाभिमानी समाज निर्माण होईल असे प्रतिपादन राजकिशोर मोदी यांनी केले.प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अॅड.अनिल लोमटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.तर राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी नगरसेवक मनोज लखेरा,सुनिल व्यवहारे,दिनेश घोडके,सचिन जाधव आदींची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *