#CoronaVirus बीड: तो ‘एक’ कोरोना पॉझिटिव्ह धनगरवाडी तालुका आष्टी चा

बीड:आठवडा विषेश टीम― शुक्रवार दि.२२ रोजी आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेला हा रुग्ण धनगरवाडी (ता.आष्टी) येथील रहिवाशी असून तो मुंबई येथून गावी परतला होता अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे.
बीड जिल्ह्यातून शुक्रवार दि.२२ रोजी पाठविलेले ४२ स्वॅब नमुन्यांपैकी १ स्वॅब नमुने अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून ३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ६ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. दि.२२ रोजी पाठविण्यात आलेेल्या ४२ नमुन्यांपैकी रात्री आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झालेल्या तरुणाच्या रिपोर्टसह इतर ३५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर यातील एक पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीडमध्ये आता ३० रुग्ण आहेत. तरुणाचा मृतदेह अजून जिल्हा रुग्णालयात आहे. रिपोर्ट आल्याशिवाय प्रशासनाला त्याबाबत काहीच निर्णय घेता येत नव्हता. मात्र आता हा मयताचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान गुरुवारी रात्री स्वॅब घेतलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.आता जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या ३० झाली आहे.