ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानकोरोना बाबत डिजिटल जनजागृती

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण व गंगापूर या तालुक्यातील ग्राम पंचायतीची निवड करण्यात आलेली आहे. या निवडलेल्या ग्राम पंचायती मध्ये ग्रामस्थापर्यत कोरोना बाबत माहिती डिजिटल माध्यमाद्वारे पोहचविली जाणार असल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका – 18 ग्रा.पं., गंगापूर -3पैठण -3 या ग्राम पंचायतीची निवड केलेली आहे. 30 मे पासून पुढील एक आठवडा कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे आजारी रुग्णांना किंवा गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणाचे पालन करत असलेल्या व्यक्तींबाबत समाजात पुर्वग्रह होऊ नयेत व भेदभावाची वागणूक मिळू नये यासाठी राज्य व केंद्र शासन यांच्याकडून माहिती, शिक्षण व संवादासाठी उपलब्ध करून दिलेले साहित्य आपल्या ग्राम पंचायतीमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचवण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत. प्रशासनातील सर्व संपर्क अधिकाऱ्यांनी ग्रामस्थापर्यत पोहचवावी, असे आवाहन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक प्रवीण पिंजरकर यांनी केले आहे.