बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

औरंगाबाद: आज जिल्ह्यात ५५ कोरोना पॉझिटिव्ह ,आतापर्यंत एकूण १७०४ कोरोनाबाधित आढळले

औरंगाबाद, दि.०३:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 503 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 55 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1704 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जसवंतपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (2), अजिंक्य नगर (1), समता नगर (2), समृद्धी नगर, एन-4 सिडको (1), जय भवानी नगर (1), लेबर कॉलनी (2), मिल कॉर्नर (4), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (1), भावसिंगपुरा (2), शिवशंकर कॉलनी (5), पिसादेवी रोड (1), कटकट गेट (1), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (1),उल्का नगरी (1),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1),शरीफ कॉलनी (1),कैलास नगर (4), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), करीम कॉलनी (1), इंदिरा नगर (1), कोहिनूर कॉलनी (1), रहीम नगर (1), शाह बाजार (1), घाटी परिसर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1),किराडपुरा (1), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (3), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 31 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1113 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 06, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 10 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) रहीम नगर येथील 42 वर्षीय पुरूष यांचा आज पहाटे 6.20 वाजता, बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय महिलेचा सकाळी 9.30 वाजता या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एका खासगी रुग्णालयात 89 वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 70, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 17, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 88 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *